Header Ads Widget

कार्ला त.मा.माहेगाव येथील सरपंच यांचा अतिक्रमण चा अहवाल चुकिचासादर करणाऱ्यांना बडतर्फ करा चोपवाड यांची मागणी

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-:-

कार्ला त.मा.माहेगाव येथील सरपंच इंद्रबाई फ़ंताडे
यांचा अतिक्रमण चा अहवाल कर्मचाऱ्यांनी चुकिचा
सादर केला या मुळे तक्रारदारावर अन्याय झाला असून असा चुकीचा अहवाल  करणाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब चोपवाड यांनी निवेदना द्वारे  मागणी केली आहे.याची चौकशी नाही झाल्यास 5 जुलै रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
  
 कार्ला त.मा.माहेगाव गट ग्रा.प.येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या संरपंच सौ.इंदरबाई खंडू फंताडे (अमोघे ) यांचे पती खंडू हाणमंता फंताडे  यांचे नावे असलेले घर हे नमुना नंबर वर असलेल्या जागे पेक्षा ज्यास्त जागा आहे ते अतिक्रमण केलेले आहे,

व संरपंच सो.इंदरबाई फंताडे (अमोघे )यांनी सरपंच पदाचा गैरवापर करून घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे,असा अर्ज सौ.सुवर्णा रामदास वडजे  यांनी करून संबधितांची चौकशी करून त्यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात यावे असा अर्ज  अॅड  कागडे यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी  नांदेड दाखल केलेला होता.

 त्या अनुसंघाने मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दि.१२  एप्रिल रोजी काढून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८  कलम १४ ( ज-३ ) व १६ नुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम  १४ (ग ) १६  नुसार सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा आसे दोन पत्र मा.गटविकास अधिकारी पं.स.नायगाव यांना कळविण्यात आले

त्या पत्राच्या अनुसंघाने दि.६ जुन २०२३ रोजी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायगांव पं.स.कार्यालयाचे विस्तार अधिकारी कानोडे व उप अभियंता जिरवनकर हे जाऊन सदरील प्रकरणाची चौकशी थातुर मातुर करून लाचलुचपत घेऊन संमधितासी संघनमत करून जिल्हाधिकारी यांना अहवाल चुकीचा अहवाल सादर करण्यात आला.
    
सदरील प्रकरणाची फेर चौकशी आपल्या स्तरावरून तात्काळ करण्यात यावे अन्यथा आपल्याच कार्यालयासमोर दि.५ /२०२३  रोजी अमरण उपोषणास बसण्यात येईल असे निवेदन  कार्ला त.मा.माहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते खाकेसाब बाबुराव  चोपवाड  यांनी दि.२० जुन २०२३ मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments