माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या ४५ गावात शांतता असल्याचे ठाण्याचे दमदार पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतलेले कर्तव्यदक्ष सपोनि विशाल एन बहातरे यांनी दिली असून सदरच्या परिसराचा अभ्यास असलेले बहातरे यांनी शांतता टिकून राहण्यासाठी आमची पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीत रात्रीची पोलीस गस्ती बरोबर अन्य ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि खाकीची वचक चांगली राबविली जात असल्याने ठाण्याच्या हद्दीतील एकूण ४५ गावावर लक्ष ठेवून दमदार कामगिरी करत असल्याचे वास्तव चित्र या परिसरात दिसून येत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीत शांतता अबाधित राहण्यासाठी व शांतता राखण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करीत आहे
ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या चार बिट मधील सुद्धा सपोनि विशाल बहातरे यांच्या मार्ग दर्शनाखाली राहेर बिट जेमादार निकम व शबीर शेख यांनी तर बरबडा बिटचे ए एस आय पोले ए एस आय निखाते जेमादार सोनकांबळे जेमादार कंधारे रुई बु कृष्णूर बिटचे जेमादार आर टी पवार व घुमे आणि कुंटूर व देगाव बिटचे जेमादार गिते व विश्वरे यांनी लक्ष ठेवले आहे

0 Comments