Header Ads Widget

नायगावचा हेडगेवार चौक उन्हाच्या तडाक्यामुळे माणसा विना दिसतोय शुकशुकाट


:-: नायगाव : मधुकर जवळे :-:

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नायगाव हेडगेवार चौक हा उन्हाच्या तडाक्यामुळे माणसा विना दिसतोय शुकशुकाट अशी म्हणण्याची वेळ आली आहे

दिनांक ३ जुन २०२३ रोजी दररोजच्या पेक्षा उन्हाची तीव्रता अतिशय तीव्र झाल्यामुळे हेडगेवार चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची संख्या कमी प्रमाणात दिसत असल्याचे वास्तव चित्र आहे

नायगाव शहर हे तालुका असल्यामुळे या तालुक्याच्या ठिकाणी अनेक भागातून नागरिक व शेतकरी कोणत्या न कोणत्या कामानिमित्त खरेदी करण्यासाठी शहरात येत असतात परंतु सध्याच्या परिस्थितीत उन्हाची तीव्रता अतिशय कडक झाल्याने नायगावचा हेडगेवार चौक माणसाविना सुकशुकाट दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

उन्हाळ्याचे दिवस संपले काही दिवसात मृगनक्षेत्र जवळ आला असला तरी उन्हाची तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर दिसत नसल्यामुळे एकंदरीत शेतीचे कामे सुद्धा शेतकऱ्याकडून कोळंबली आहेत शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी खत बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत

सदरच्या उन्हाच्या तडाक्यामुळे शेतकरी घराच्या बाहेर निघत नसल्याचे सुद्धा ग्रामीण भागात दिसत असले तरी नायगावचा हेडगेवार चौक माणसांविना बेवारस असल्या सारखा दिसत आहे 

Post a Comment

0 Comments