विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे : देविदास जेट्टेवाड
नायगाव तालुक्यातील कोकलेगाव हे छोटेसे गाव. येथील शिक्षक गोविंद गाजलवाड हे या गावचे सुपुत्र! त्यांनी शिक्षणातून क्रांती घडते हे मनोमन जाणले. आणि आपल्या मुलांना वैद्यकिय शिक्षण देण्याचे ठरविले आहे
या कामी गोविंद गाजलवाड यांच्या सौभाग्यवती कविता गोविंद गाजलवाड यांनीही त्यांना खंबीर साथ दिली आहे
गौरव, वैभव आणि योगेश या तिन्ही सुपूत्रांनी आई वडिलाचे स्वप्न साकार केले असून वैद्यकिय क्षेत्रात त्यांच्या मुलांनी इतिहास घडविला. उत्तुंग यश प्राप्त केले.
तालुक्यातील कोकलेगावचे नाव रोशन केले.गौरवने एम.आय.एम.एस.आर.युनिव्हर्सिटी लातूर येथून शिक्षण पूर्ण केले. तर काल वैभवला शासकीय मेडीकल काॅलेज घाटी, औरंगाबाद येथून पदवी प्रदान करण्यात आली आहे
योगेश हा शासकीय मेडीकल काॅलेज अलिबाग येथे शिक्षण घेत आहे.जिद्द, मेहनत, परिश्रम ही त्रिसूत्री वापरून आणि यश संपादन करत हा घडवलेला इतिहास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.डाॅ.गोरव, डाॅ. वैभव आणि डाॅ. योगेश यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि भावी वाटचालीस बऱ्याच सर्व सामान्य जनते कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

0 Comments