राजकीय वर्तुळातील राजकारणापेक्षा गावपातळी वरील राजकारण वेगळ्या पद्धतीचे असते परंतु नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या गटा कडून कुंटूरकर गटाचा पराजय करण्यात आला होता
तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी शिवाजीराव रामजी पाटील इज्जतगावकर यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून रामराव मोहनाजीराव पाटील डोईफोडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या पॅनलचा विजय झाला होता
तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे काल परवाच सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्या सदरच्या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या गटाकडून राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या गटाचे हरी पाटील इज्जतगावकर यांच्या गटाचा सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता
सदरच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे
इज्जतगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर नूतन चेअरमन म्हणून शिवाजीराव पाटील इज्जतगावकर यांचची तर व्हाईस चेअरमन म्हणून रामराव पाटील डोईफोडे यांची निवड करण्यात आली आहे

0 Comments