Header Ads Widget

लोहगांव युनिट मध्ये विद्युत सहाय्यक म्हणून कामावर घेतले नसल्यामुळे आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्याचे गोपाळ लक्ष्मण आंबटवार यांचे थेट मुख्यमंत्र्याना निवेदन ? -


माधव पवार / मारोती इबितवार /- 

नायगाव तालुक्यातील कुंटूर सांगवी येथील रहिवासी असलेले गोपाळ लक्ष्मण आंबटवार यांना ८३ टक्के अपंगत्व असताना सुद्धा शासन दरबारी आंधळ दळतय कुत्र पीठ खातोय अशी गत निर्माण झाली असल्यामुळे बिलोली तालुक्यातील लोहगाव विद्युत वितरण युनिट मध्ये कामावर घेतले जात नसल्यामुळे सदरच्या व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली आहे

प्रशासन आमच्या अपंगत्वाचा विचार करत नसल्याने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मदहन करणार असल्याच्या इशारऱ्याचे निवेदन आंबटवार यांनी देऊन कळविले आहे 

तालुक्यातील कुंटूर  सांगवी येथील रहिवासी असलेले गोपाळ लक्ष्मण आंबटवार हे ८३ टक्के अपंग असताना सुद्धा सदरील विद्युत सहाय्यक या पदाची भरती सन २००४ व सन २०१९ साली निघाली होती आणि ऑनलाईन पद्धतीने अर्जदार गोपाळ लक्ष्मण आंबटवार यांनी अर्ज केला होता त्या अनुषंगाने संबंधीत विद्युत सहाय्यक या पदाची भरती सरळ सेवा भरती असल्यामुळे यांचे नाव प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट होते

बिलोली तालुक्यातील लोहगाव सब स्टेशन येथे दिनांक १९ सप्टेंबर २०१९ ते २०२२ साला पर्यंत कोरोनाच्या महामारीच्या कार्यकाळात यांनी बाह्य सोत्र ऑपरेटर म्हणून कामावर कार्यरत होतो संबंधित अधिकाऱ्याना  पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी मला कामावरून कमी केलेले आहेत लोहगाव सब स्टेशन येठे कामावर रुजू करून घेत नसल्यामुळे तात्काळ कामावर रुजू कराव्या अन्यथा आत्मदहन करण्याचा मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे

लोहगाव सबस्टेशन येथे बाह्य सोत्र ऑपरेटर व विद्युत सहायक म्हणून कामावर रुजू करून घेण्याचे आदेश पारित करण्यात करावेत अन्यथा ना विलाजाने आत्महत्या दहन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे निवेदन सुद्धा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह नायागांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांना निवेदन दिलो होतो

लोहगाव सब स्टेशन येथे बायसोत्र ऑपरेटर व विद्युत सहायक म्हणून कामावर रुजू करून घेण्याचे आदेश पारित करावेत अन्यथा आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नसल्याचे






Post a Comment

0 Comments