Header Ads Widget

तेलंगणा राज्यातील आरमूर येथून नांदेड सायबर ब्रॅंचेशिटीकर यांच्या मदतीने हिमायतनगर पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींना केले जेरबंद


हिमायतनगर नागोराव शिंदे

 हिमायतनगर  पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६ / २०२२ कलम २२४ आय पी सी मधील आरोपी नामदेव रामचंद्र दिवसे यास पोलीस स्टेशन येथील महिला सपोउपनी श्रीमती कागणे मॅडम पो.हे.का  नागरगोजे पोलीस नाईक चौदंते यांनी सदरील फरार आरोपीला तेलंगणा राज्यातील आरमूर येथून सापळा रचून जेरबंद केले आहे 

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्तीय कारागृह छत्रपती संभाजीनगर येथून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपीला कारागृहातुन कोरोना आकस्मीत अभीवचन रजेवर सोडण्यात आले होते परंतु स्वतःहुन हजर होण्या ऐवजी फरार झाला होता

सदरचा आरोपी हा दिनांक ९ नोव्हेंबर २०२० एकूण ४५ दिवसाच्या रजेवर आला होता तेव्हा पासून फरारच असल्यामुळे त्या आरोपीला तेलंगणा राज्यातून म्हणजे आरमूर येथून सायबर क्राईम ब्रँचे शिटीकर यांच्या मदतीने हिमायतनगर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मा.अपर पोलीस अधिक्षक भोकर मा सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर यांनी हिमायतनगर येथील पोलिसांची व सायबर सेल मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे फरार आरोपीला जेलबंद केल्या प्रकरणी हिमायतनगर पोलीस टीमचे कौतुक केले आहे 


Post a Comment

0 Comments