Header Ads Widget

जिल्ह्यात आवकाळीचा धुमाकूळ नायगाव माहूर उमरी हदगांव मुदखेड लोहा कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस तीन ठिकाणी जीविहानी !!



        माधव पवार
नायगाव : तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कैवल्य ढाबा वादळी वाऱ्या पूर्ण उधवस्त झाला असल्यामुळे त्या वरील सर्व टीना पत्रे उडवून जाऊन चारशे ते पाचशे फूट शेतात पडले आहेत आहे
या ढाब्यावर वादळी वारा व गाराचा पाऊस पडत असल्यामुळे काहाळा खुर्द येथील रहिवासी असलेला मयत व्यंकटी लक्ष्मण दंदलवाड वय ४५ वर्ष हा जागीच ठार झाला तर दुसरा एक जन जखमी झाला असल्याची घटना दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वाजता घडली आहेकंधार : हाळदा जाणारी बस वादळीवाऱ्यासह गाराचा पाऊस पडत असताना खड्यात पडली असल्यामुळे या झालेल्या अपघात एकूण १८ ते १९ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून हा आवकाळी पावसाचा फटका असल्याचे बोलल्या जात सदरची रस्त्याच्या बाजूला जाऊन खाली पलटी खाली असल्याचे सांगण्यात येतेपरंतु सदरचा अपघात हा उस्माननगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झाला नसल्याचे पोलीसानी सांगितले असले ते अपघात बारूळ जवळ कुठे तरी झाल्याचे सांगण्यात येते आहे 

मुदखेड : तालुक्यासह ग्रामीण भागात ही आवकाळीने धुमाकूळ माजविला असल्यामुळे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला असल्याची माहिती मिळते गेल्या दोन दिवसा पासून या विभागात आकाश अचानक पणे काळे कोट ढग निर्माण होऊन सदरच्या वादळीवाऱ्या सुसांड पाऊस पडत असल्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी या विभागात गाराचा पाऊस पडत असल्याने अनेक पिकाचे नुकसान झाल्याचे वर्त आहे 
उमरी : तालुक्यात गारपीट वादळीवाऱ्यासह पावसाने व आकाशातुन विजा कोसळत असल्यामुळे हंगीरगा येथे येथील एका शेतकऱ्यांच्या म्हैसीवर वीज पडून ठार झाली असल्याची घटना घडली असून यात शेतकऱ्यांचे अंदाजे ५० हाजर रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहेमाहूर : तालुक्यासह इतर भागात घरा वरील पत्रे उडाली आहेत या एका घटनेत टिन पत्रावर ठेवलेला दगड अंगावर पडल्याने सातघरी येथील महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्याच अनेक पक्षी ही मृत्यू पावले असल्याचे सांगण्यात येते आहे

हदगाव : तालुक्याला सुद्धा पावसाने झोडपले सदरची घटना रात्रीच्या वेळी घडली असली तरी वादळी वाऱ्यासह पाऊस ५० ग्रामच्या जवळ पास वजनाच्या गारा पडल्या असल्याचे सांगण्यात येते या विभागात सुद्धा गारा पाऊस जोर धरला त्याच बरोबर बाऱ्हाळी येथे अवकाळी पाऊसाने चांगला जोर धरला होता अशी माहीती मिळते आहे 





Post a Comment

0 Comments