सत्ता आणि सत्तेतून प्रगती होण्यासाठी नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी पार पडत असताना सदरच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस युतीचे शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी होतील असी अपेक्षा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकूण १७ जागेसाठी मतदान होत असून सदरची निवडणूक ही सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर कुंटूर मार्केट कमिटीच्य प्रगतीसाठी असल्यामुळे या निवडणुकी दरम्यान एकूण ७६६ मतदाराने मतदानाचा हक्क बजावणार आहेतसदरच्या निवडणुकी मध्ये माजी मंत्री स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या विचार धारेतून मार्केट कमिटीच्या उन्नतीसाठी मतदाराने शेतकरी विकास पॅनलला विजयी करतील अशी अपेक्षा प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केली आहे
तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी ही काबीज करण्यासाठी भाजपा काँग्रेसची युती करण्यात आली या सदरच्या युतीमध्ये एक उमेदवार अगोदरच बिनविरोध निघाला असला तरी १७ जागेसाठी मतदान होत असून ह्या सुद्धा १७ जागा काँग्रेस भाजपाच्या हाती शंभर टक्के लागतील असा विश्वास प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे
यात राजेश देशमुख कुंटूरकर बरबड्याचे सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन अंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर माजी सरपंच बालाजी मदेवाड मनोज पाटील मोरे टाकळीकर मा.प्राचार्य मनोहर पवार यांच्या प्रयत्नामुळे काँग्रेस व भाजपाची युती करण्यात आली असल्याची ही माहिती प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील यांनी दिली आहे

0 Comments