हिमायतनगर : नागोराव शिंदे -
राज्य परिवहन महामंडळात अतिशय सेवा चांगल्या प्रकारे देणारे व कर्तव्यदक्ष आपली कार्यसेवा शेवट पर्यंत बजावणारे नांदेड आगारातील कार्यशाळा अधीक्षक शिवाजीराव मगर यांचे निधन दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी किनवट येथे सेवानिवृत्तीच्या दोन महिने अगोदरच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांची ज्योत मावळली आहे
येथून जवळच असलेल्या किनवट येथील शिवाजीराव रामराव मगर मुक्काम पोस्ट किनवट येथील रहिवासी असलेले मगर हे नांदेड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील कार्यशाळा अधीक्षक नांदेड या पदावर कार्यरत असताना अचानक निसर्गाने त्यांच्यावर घाला घातल्याने आज त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले आहे
येत्या दोन महिन्यांमध्ये त्यांची सेवा समाप्ती कार्यक्रम संपणार होता तेच वयाच्या ५७ वर्षी त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा त्यांचा परिवार असून त्यांच्या जाण्याने कुटुंबासह सर्व पाहुणे मंडळीवर दुःखाचा डोंगर कोसळला शिवाजीराव मगर हे ढानकी तालुका उमरखेड येथील माजी सरपंच शिवाजी फाळके यांचे ते मेहुणे होय त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक १७ रोजी सोमवारी किनवट येथे सकाळी दहा वाजता किनवट येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
त्यांच्या जाण्याने जे त्यांच्या परिवारावर पाहुणेमंडळीवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना सदबुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नायगाव फास्ट न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

0 Comments