तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून पळसपुर सज्जा मधील अनेक ठिकाणावरून दिवसाढवळ्या महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून या भागातील वाळूमाफिया महसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू चोरी करीत असताना दिसत आहेत
हिमायतनगर तालुक्यामधील कोणत्याही पेंडाचा लिलाव झाला नसल्याने तालुक्यामधील महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वाळू माफिया शासनाचा लाखो रुपयाच्या महसुलावर डल्ला मारत असताना चे चित्र तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर पाहावयास मिळत आहे
याबाबत पळसपुर सज्जा चे तलाठी बडेवाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता मी रेल्वेमध्ये आहे नांदेड वरून येत आहे आल्यावर बघुत असे उडवा उडवी चे उत्तर देऊन फोन ठेवून दिला तर येथे उत्खनन होत असल्याबाबत हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि डि भुसनुर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की महसूल प्रशासनाचे तहसीलदार यांना सांगा यावरून असे चित्र दिसून येते की पळसपुर येथून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशाला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडला आहे
या बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी होत असलेल्या अवैध उत्खनाबाबत सखोल चौकशी करून संबंधित सज्जा चे तलाठी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून मागणी जोर धरत आहे

0 Comments