Header Ads Widget

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी वंजारवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला कधी भेट देणार ? -

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील वंजारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी मध्ये रात्री म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास शाळेतील सर्वच कपाट फोडून त्यातील अतिशय महत्त्वाची सर्वच कागदपत्रे अज्ञात आरोपीने जाळून टाकले असताना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी वंजारवाडी येथील शाळेला कधी भेट देणार असा विषय चर्चेला जात आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे वंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच कपाट फोडून त्यातील अतिशय महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात आरोपीने जाळून टाकल्यामुळे नंदकुमार काकडे कृष्णूर येथील केंद्र प्रमुख उद्धव ढगे व रुई बु शाळेचे बासटवार यांनी सदरच्या रेकार्ड जळीत प्रकारणी तात्काळ भेट देऊन घटनेची पाहणी केली व शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण व इतर शिक्षकाची भेट घेऊन सदरचा घडलेला प्रकार जाणून घेतला आहे 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ष ठाकूर यांनी अध्याप चर्चा जळीत प्रकरणातील शाळेला भेट दिली नसल्यामुळे गावकऱ्यातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या शाळेतील सण १९६० पासून चे मूळ प्रवेश निर्गम सह अनेक महत्त्वाची कॉर्न जाळून टाकल्याने वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाट लागली असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात असले तरी हे कार्यकारी अधिकाऱ्यानी भेट देणार असेही जनतेतून बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments