Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीचे आज मतदान ७६६ मतदारानी बजावणार मतदानाचा हक्क - काँग्रेस भाजपा युतीच्या विरोधात ८ अपक्ष उमेदवार या पैकी दोन पत्रकार रिंगणात !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीचे मतदान आज दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी मतदान होणार असल्यामुळे कुंटूर पोलीसाचा बंदोबस्त ही ठेवण्यात आला असून या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस पक्षाची युती झाल्याच्या नंतर या निवडणूकीत १७ विरोध ८ असी निवडणूक होत आहे
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीचे आज मतदान ७६६ मतदारानी बजावणार मतदानाचा हक्क - काँग्रेस भाजपा युतीच्या विरोधात ८ अपक्ष उमेदवार या पैकी दोन पत्रकार  सदरच्या रिंगणात सत्ताधाऱ्याच्या विरोधात आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली लोकशाही मार्गाने १७ विरोध ८ असी लढत झाली अखेर मतदानाचा दिवस २८ ठरला आणि मतदान होत असून दिनांक २९ एप्रिल रोजी निकाल लागणार असल्यामुळे शेतकरी विकास पॅनलचा नक्की विजय निश्चित आहेकुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपा युती झाल्याच्या नंतर १८ अपक्ष उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिला व ७६६  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य ३४६, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य ३३९ व्यापारी ८१ असे मतदान असल्याचे    आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर माजी सरपंच बालाजी मदेवाड मनोज पाटील मोरे प्राचार्य मनोहर पवार यांनी सांगितले आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट थोडक्यात बाजूला गेला असला तरी आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष यांची युती असेल व भाजपा पक्ष आणि शिंदे गटाची सुद्धा युती असणार का ? असा प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत आहे 






!

Post a Comment

0 Comments