Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह कवळे गुरुजी चर्चेत असताना डॉ.मीनलताई खतगावकराचे लक्ष ही याच मतदार संघाकडेच ? --

      माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघाकडे विविध राजकीय पक्षातील नेते मंडळीचे लक्ष सदरच्या निवडणुका लागण्यापूर्वीच लक्ष केंद्रित होत असल्याचे दिसून येत आहे

मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या मतदार संघाची विधान सभेच्या निवडणूक घेतल्या जातात असे अनेक वेळा दिसून आले आहे 

आगामी काळातील नायगाव विधानसभेच्या निवडणुकीत रण मैदानी उतरण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक महिन्या पासून होत आहे

याच मतदार संघाकडे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ . मीनलताई खतगावकर यांचे सुद्धा लक्ष आता याच मतदार संघाकडे लक्ष लागल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदार संघात अनेक पक्षांची नेते मंडळी व पुढारी आहेत परंतु आगामी काळातील नायगाव विधान सभेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात कसल्याच प्रकारच्या हलचली नसल्याचे चित्र दिसून येत आहे

या मतदार संघात भाजपा पक्षांच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून आगामी काळातील विधानसभा लढविण्याची अनेकांची तयारी असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून याच मतदार संघात सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस व भाजपाची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना सध्याच्या परिस्थितीत थंडगार असल्याचे ही वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे

Post a Comment

0 Comments