Header Ads Widget

सरसम येथे " द बर्निंग " किराणा दुकान जळून खाक लाखोंचे आर्थिक नुकसान तात्काळ मदत द्या - मागणी


हिमायतनगर : नागोराव शिंदे 


तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेले साई किराणा दुकानला अचानक लागलेल्या " द बर्निंगमुळे " बेचीराख झाले असून दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. यामुळे दुकानदार चालक साईनाथ रामजी कुचरवाड यांचे ४ ते ५ लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

" द बर्निंगचे कारण अद्याप ही स्पष्ट झाले नसून  शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असले तरी सदरची आग कशामुळे लागली हा विषय अतिशय महत्वाचा असल्याचे माणल्या जाते मौजे सरसम बु.येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साईनाथ रामजी कुचरवाड नामक युवक किराणा दुकान चालवत होते

दुकान मुख्य चौकात असल्या कारणाने व ग्राहकांना रास्त दरात किराणा मालाची विक्री करणारे एकमेव किराणा दुकानदार म्हणून प्रसिद्ध होते व या व्यवसायात झेप घेतली होती 

अचानक पणे दिनांक ७ मार्च २०२३ रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या किराणा दुकानात आग लागली आणि पाहता पाहता त्यांच्या दुकानातील सर्व किराणा माल जळून खाक झाला आहे.रंगपंचमी च्या सकाळी सकाळी दुकानातून धूर बाहेर पडत असल्याचे काही गावकर्यांनी पाहिले असता त्यांनी दुकान मालकास सांगितले

साईनाथ कुचरवाड यांनी सकाळी दुकान उघडून पाहिले असता आतील सर्व किराणा माल जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसून आला.आग चालूच होती ती विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
   
या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि डी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली कांगणे मॅडम व सहकारी टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन  येथील पंचनामा केला.या वेळी दुकानाचलकास आर्थिक सहाय्य मिळाले पाहिजे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments