Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला शिकविला नायगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यानी धडा : थकीत बिल १० लाख ९० हाजार २७६ रुपये भरले नसल्याने ठोकला कुलूप -


माधव पवार /
मधुकर जवळे - 

दिव्याखाली अंधार ठेवून नायगावच्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानी नगर पंचायतचे एकूण दहा लाख ९० हाजार २७६ रुपये नगरपंचायतला भरले नसल्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यात चांगलेच जुपंले असल्यामुळे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाना कुलूपच ठोकले असल्यामुळे खळबळ उडाली आहे 

नायगाव येथे हेडगेवार चौका जवळ विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय असून या कार्यालायाकडे नगरपंचायतीचे थकीत रक्कम असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी भरण्यासाठी तयार नसल्याने अखेर नगरपंचायतीची मालमत्ता असलल्या इमारतीला अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी कुलूप ठोकून मोकळे झाल्याचा प्रकार नायागांव येथे घडला असला तरी मुखअधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी आदेश दिला आहे

सदरच्या विद्युत वितरण कंपनीने इमारत भाडे सदर अधिकाऱ्यांनी थकित असलेले बिल भरले नसल्यामुळे नगर पंचायतने विद्युत वितरण कंपनीला धडा शिकविण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्यधिकाऱ्यानी कुलूप लावण्याचा आदेश दिल्यावरून सदरच्या कर्मचाऱ्यांनी कुपच ठोकला असल्याचे चित्र नायगाव येथे पाहावयास मिळाली आहे

नायगावच्या विद्युत महावितरण कंपनी कडून नगर पंचायतीचे  एकूण थकीत बिल दहा लाख ९० हजार २७६ रुपये येणे असताना सुद्धा देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांत चांगलीच धास्ती निर्माण केली असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

नायगाव येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय असल्याने या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव यांच्यासह कर्मचारी रामेश्वर बापूले श्रीधर कोलमवर मुन्ना मंगरुळे संभाजी भालेराव रमेश चव्हाण गणेश चव्हाण गोपाळ नाईक बालाजी बोईनवाड श्रीराम बेळगे धनराज करणे शेख मौला उमेश कांबळे प्रवीण भालेराव साईनाथ बेळगे आदी कर्मचाऱ्यांनी सदरच्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे


Post a Comment

0 Comments