Header Ads Widget

मद्रेवार फॅमिली शॉप समोरील हायवे रोडवर गाड्यांची गर्दी अपघात होण्याची शक्यता ? स्थानिक प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज !!

मधुकर जवळे / शेख आरीफ
नायगाव शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या मद्रेवार फॅमिली शॉप समोर गाड्यांची मोठी गर्दी होत असून सदर दुकानासमोर पार्कींग ची सुविधा नसल्याने वाहने हायवे रोडवर थांबत आहे यामुळे हायवे रोडवर चालणार्या वाहनांना मोठी कसरत करावी लागत असून येथे अपघात होण्याचीही शक्यता दिसून येत आहे

यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष घालून वाहनधारकांना होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी होत आहे
           
नायगाव शहरात मद्रेवार फॅमिली शॉप हे लवकरच नरसी नांदेड या नॅशनल हायवे रोडवर रूज होत आहे परंतु याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना वाहने थांबवण्यासाठी सुविधा नसल्याने हायवेवर चालणार्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे हायवे रोडवर गाड्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसत आहे

यामुळे याठिकाणी मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन हायवे रोड सुरक्षित करून द्यावा अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments