Header Ads Widget

" होय गुन्हा दाखल झालाय " विभागीय चौकशी चालू असताना करण्यात आलेली पोलीस कारवाई अन्याय कारक ? तहसीलदार गजानन शिंदे यांचा आरोप - धान्य प्रकारण ३३ लाखाचे !!

       माधव पवार 
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी हिंगोली येथे कार्यरत असताना कार्यालयाच्या पुरवठा विभागातून सन २०१९ जानेवारी ते २०१९ च्या जुलै सहा महिन्याच्या कार्यकाळात ऑफलाइन धान्य वाटप केलेल्या प्रकरणात १४७ गुन्हेगार ? होते त्यापैकी ११६ स्वस्त धान्य दुकानदारानी पैसे भरले आणि १६ दुकान दारानी ? पैसे भरले नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरचे प्रकरण कोर्टात गेले असल्याचे सांगण्यात येते परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली व नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे ती सदरची कारवाई अन्याय कारक ? करण्यात आली या प्रकरणात माझा आणि कर्मचाऱ्यांचा काही दोष नसल्याचा तहसीलदार यांनी गजानन शिंदे आरोप यांनी केला आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक व हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक  एस एस आमले यांनी आपली चौक कामगिरी बजावत फिर्यादी घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस आमले यांनी दिली आहे

तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह अव्वल कारकून कैलास वाघमारे इम्रान पठाण बी बी खडसे आणि स्वस्त धान्य दुकानदार पी आर गरड ज्ञानेश्वर मस्के विनोद आडे एस के पठाण डी एम शिंदे मिलिंद पडघन गणाजी बेले गोपाल तापडिया डी बी चव्हाण गजानन गडदे गोविंदा मस्के पतंगराव मस्के व तालुका विक्री संघ दुकान चालकासह तीन महिला दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक एस एस आमले सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवराव जिव्हारे सपोनि अशोक कांबळे जमादार अशोक धामणे यांनी स्वस्त धान्य त्या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत







Post a Comment

0 Comments