अंधश्रद्धेने गुरपटलेल्या गागलेगावात भानामती केल्याच्या कारणा वरून चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण एकाचा मृत्यू - रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम ३०२ दाखल करण्यात आले यात रत्नदीप वामन डुमणे व दयानंद जाऊ वाघमारे यांना पोलीसानी अटक केली तर यातील एक आरोपी वामन डुमणे यांना अर्ध्या तासात अटक करण्याची शक्यता ? - वर्तवली जात आहे
बिलोली तालुक्याच्या रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गागलेगाव येथे अंधश्रद्धेत गुरपटलेल्या तिघा व्यक्तीने भानामती केल्याच्या कारणावरून एका चिंचेच्या झाडाला एकास बांधून मारहाण करीत असताना सदरच्या महानामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात कलम ३०२ दाखल करण्यात आल्याची माहिती सपोनि संकेत दिघे यांनी दिली आहेगगलेगाव येथील घडलेल्या घटनेत मयत हनमंत काशिराम पांचाळ वय ८५ वर्ष याला आरोपी वामन डुमणे यांच्या मुलीवर कर्णी, भानामती केलास असे म्हणून रत्नदीप वामन डुमणे, वामन डुमणे राहणार गागलेगाव व दयानंद वाघमारे राहणार कागंठी या तिघांनी संगणमत करून त्यांच्याच घरा समोर असलेल्या चिंचेच्या झाडाला मयत पांचाळ याला बांधून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यातच तो ठार ठार झाला आहे
तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी रवाना झाले असता या ठिकाणी अंधश्रद्धेच्या माध्यमातून म्हणजे भानामती केल्याच्या कारणावरून सदरच्या व्यक्तीला अगोदर चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे
त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले असल्यामुळे पोलिसांनी सदरच्या गुन्ह्यातील तीन जणांना ताब्यात घेतले असल्याचे ही सपोनि दिघे यांनी सांगितले व पुढील कसून रामतीर्थ पोलीस करीत आहेत

0 Comments