Header Ads Widget

गावची जत्रा अन कारभारी सतरा तशी राज्याची झालीय अवस्था

         माधव पवार
दिल्ली असो की गल्ली राजकारण म्हटले की अतिशय खालच्या थरावर गेलेले असते एखाद्या गावात जत्रा असले की त्यात सतरा कारभारी होत असतात त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात १७ कारभारी  झाले असल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकाचा पत्ता एकाला लागत नसल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे

गल्ली आणि दिल्लीच्या राजकारणा मध्ये फरक असला तरी निवडणुकीच्या काळात गल्लीतील मतदारापुढे नेत्यांना मुजरा करावा लागतो तर राजाचे नेतृत्व करण्यासाठी व मंत्रीपद मिळविण्यासाठी राजकीय नेते मंडळींना दिल्लीत मुजरा करावा लागतो हे सत्य वास्तव असल्याचे मित्र नेहमी पाहूयात मिळत असते

जत्रा म्हटले की कोणत्याही गावात एकापेक्षा एक १७ कारभारी झाल्याचे दिसतात तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकापेक्षा एक कारभारी होत असल्यामुळे राज्यातील जनतेच्या विश्वासाला मोठा तडा बसत असल्याचे वास्तव चित्र सध्या तरी पाहुयास मिळत असून सदरचे १७ कारभारी एकत्र आल्यास निदान १७ तरी निर्णय राजाच्या हितासाठी होतील अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments