बहुजनासाठी व बहुजन समाजाच्या समस्येवर वारंवार सर्व प्रकारे लढणारा पक्ष म्हणून उदयास आलेल्या बहुजन मुक्ती पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी साईनाथ कांबळे यांची दि.५ फेब्रुवारी रोडी नियुक्ती करण्यात आली आहे
बहुजन मुक्ती पार्टी ही सन २०१२ ला बहुजन समाजाच्या तथा बारा बलुतेदारांच्या प्रश्नावर लढणारा पक्ष म्हणून उदयास आली. मान्यवर कांशीराम यांच्या प्रेरणे उभा राहिलेला हा पक्ष अशी सुद्धा या पक्षाची खाती आहे.केडर बेस लीडर घडवून समाजाच्या समस्याचे समाधान करू इच्छिणारा हा पक्ष आहे अशी लोकांची धारणा आहे
या पक्षात साईनाथ कांबळे हे पक्ष स्थापनेपासून ते आजतागत एकनिष्ठ आहेत पक्षाने अनेक चढउतार पाहिले परंतु साईनाथ कांबळे हे एकनिष्ठपणे पक्षाची एक सामान्य कार्यकर्ता म्हणून धुरा सांभाळली,बिलोली तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच दिवस काम पाहिले
म्हणून दि.५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत अनेक इच्छुक असताना पक्ष एकनिष्ठतेच्या बळावर साईनाथ कांबळे यांना प्रदेशाध्यक्ष श्रीकांत दादा ओवाळ व महिला प्रदेशाध्यक्ष, ॲड.सुजाता चौदंते, यांच्या प्रस्तावाने नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी एकमताने नियुक्त करण्यात आले
यावेळी पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिल माने, युवा प्रदेशाध्यक्ष लखन चव्हाण, महासचिव सारिका भगत, आताऊल्ला खान, यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी गेल्या दहा वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठ पणे काम केले
साईनाथ कांबळे नांदेड जिल्हाध्यक्ष बि.म.पी. !!
मी गेल्या दहा वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठ पणे कामकेले
व मी तालुकाध्यक्ष असताना तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याच्या बाहेरील अनेक गावात पक्षाचे गाव तिथे शाखा निर्माण केले आहे आणि पक्षाची विचारधारा व पक्ष पोहोचण्याचा इमानदारीने प्रयत्न केला आहे
याची दखल पक्षश्रेष्ठीने घेऊन अनेक इच्छुकांच्या स्पर्धेत माझ्यावर ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे आभार मानतो. त्यांनी दाखवलेला विश्वास मी नेटाने पूर्णत्वास नेईल अशी ग्वाही देतो

0 Comments