ग्रामीण भागात विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कॉटर बांधून देण्यात आले परंतु त्या कॉटर मध्ये कोणताच कर्मचारी राहत नसल्यामुळे व त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने सदरच्या कर्मचाऱ्यांना अपडाऊन करावे लागत आहेविद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता देगलूर यांच्यासह अधीक्षक अभियंता नांदेड यांनी तात्काळ लक्ष देऊन सदरच्या कॉटरची कर्मचाऱ्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावेत असे जनसामान्य माणसातून बोलल्या जात आहे
विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यासह कडून थकीत बिले व विद्युत वितरण घरगुती मीटरचे बिले वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना ताकीद करत असतात व लाखो रुपयांची वसुली होत असते विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत बांधण्यात आलेल्या कॉटर मध्ये सुविधा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी अपयशी ठरत असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
विद्युत वितरण कंपनीच्या लाईन मनाला कर्तव्यावर असताना कोणत्या तरी जवळच्या हॉटेल मध्ये बसून जेवण करावी लागते सदरचे कॉटर व्यवस्थित व सुविधा उपलब्ध केले नसल्याने कर्मचाऱ्यांची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे चित्र वास्तव आहे
सदरच्या कर्मचाऱ्यांना उन्हा तानात लोखंडी खांबावर चढताना चटके खावे लागते व लाईन स्टैंड करावी लागते व कर्मचाऱ्यांना थोडी फार विश्रांती घेण्यासाठी कॉटरची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे ही चित्र स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments