भुदरगड तालुक्यातील अक्षर साहित्य मंच गारगोटीच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा बालासाहित्य विभागातला अक्षरसागर राज्यस्तरीय बालासाहित्य पुरस्कार या वर्षी नायगाव येथील प्रसिद्ध साहित्यक वीरभद्र मिरेवाड यांच्या ग्रंथाली प्रकाशन मुंबई या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या "आनंदाची फुलबाग " या बालकविता संग्रहाला जाहीर झाला आहे
येत्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी गारगोटी जि.कोल्हापूर येथे मराठी भाषागौरव दिनानिमित्त मिरेवाड यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.मा.ग. गुरव यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे
मिरेवाड हे उपक्रमशील आदर्श शिक्षक, उत्कृष्ट निवेदक व सृजनशील साहित्यिक असून बालसाहित्यासह इतरही साहित्य प्रकारांत त्यांचि मुशाफिरी आहे.
विदेहाच्या सावल्या ,पाखरगाणी, शांतिदूत डॉ मनमोहन सिंग ,माती शाबूत राहावी म्हणून, कोरोना काळात मुलांसाठी कविता, आनंदाची फुलबाग ही ग्रंथसंपदा त्यांचि प्रकाशित आहे. मराठी साहित्यातील कवी कुसुमाग्रज काव्यसंग्रह लोकसंवाद कै.बळवंतराव चव्हाण कै.गंगबाई मामीडवार मुक्तासाळवे लोकसंकेत पद्मगंगा ,काव्यर्चना,जे.के.जाधव आणि अ भा.बालकुमार साहित्य संस्था पुणे प्रसाद बन ग्रंथगौरव बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यासह अनेक उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

0 Comments