Header Ads Widget

बरबडा येथे त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

बरबडा :- किरण हणमंते :
बरबडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. 
त्यानंतर भारतबाई कोलगाने यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. लगेच महिला मान्यवर यांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आला 
   
या जयंती च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी सौ.भारतबाई कोलगाने, तर प्रमुख पाहूणे माजी पंचायत समिती सदस्या सौ.अंजनाताई  मदेवाड, पोलिस पाटिल प्रतिनिधी कानगुले, आशावर्कर पर्यवेक्षिका अर्चना चुनूकवाड, अंजना पुरमवाड,  पोस्टमॅन कु. सत्यभामा चिंतोले, राधाबाई सुरेवाड, अनिताताई माचनवाड, सिमा सर्जे, सुनीता सुर्यतळ, शोभाबाई  विठ्ठलकर, मरेवाड, शांताबाई नेरलेवाड या मान्यवरांची आणि  बौध्द समाजातील महिलांची उपस्थिती होती.
 माता रमाईच्या उपकाराची जाणीव ठेऊन माता रमाई यांची जयंती बरबडा येथील महिलांनी साजरी करण्याचे प्रयोजन करून दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी करण्यात आली

दुपारी गावातील प्रमुख रस्त्याने माता रमाई यांच्या तैलचित्राची मिरवणूक मोठया प्रमाणात महिलांच्या उपस्थितीत काढण्यात आली. हि मिरवणूक डीजे च्या तालावर लहान मुल मुली नाचत होती अशी मिरवणूक नायगाव तालुक्यातील मोठी असणारी आहे.

Post a Comment

0 Comments