नायगाव तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथे विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत गेल्या ३० ते पस्तीस वर्षाखाली बांधण्यात आलेले दर्जेदार कॉटर अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनानी बांधून दिले आहे
परंतु या सदरच्या कॉर्टर मध्ये दहा ते पंधरा वर्षे अधिकारी व कर्मचारी राहत होते परंतु गेल्या वीस वर्षा पासून अधिकारी व कर्मचारी राहत नसल्यामुळे सदरचे कॉटर अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्या विना आजारी पडले आहे
तालुक्यातील कृष्णुर युनिट अंतर्गत घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत अनेक कॉटर बांधण्यात आले या कॉटर मध्ये अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याना राहण्यासाठी दर्जेदार कॉटर बांधण्यात आले आहेघुंगराळा येथील विद्युत वितरणच्या कॉटर असताना सुद्धा या ठिकाणी कर्मचारीच राहत नसल्यामुळे सदरच्या इमारती समोर बाभळीचे काटेरी झाडे झुडपे आजूबाजूचा परिसर अतिशय घाण झाला असल्याने वास्तव चित्र पाहवयस मिळत असून सदरची स्वच्छता करून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या भागातील जनतेतून होत आहे
विद्युत वितरणचे युनिट कृष्णूर असले तरी घुंगराळा येथे कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी शासनाने अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कॉटर बांधून दिले परंतु या ठिकाणी घाणीचे सम्राज्य पसरले असल्यामुळे कोणता ही कर्मचारी राहण्यास धजावत नाहीत त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या मार्फत कॉटर दुरवस्था झालेली दुरुस्त करून दयावेत असे ही भागातील जनतेतुन बोलल्या जात आहे

0 Comments