नायगाव तालुक्यातील कुंटूर व बडबडा प्रार्थमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत लाखो रुपये खर्चून आरोग्य विभागा कडून बांधण्यात आल्या आहेत परंतु आज घडीला काम पूर्ण होऊन बरेच महिने झाले असताना सुद्धा या सदरील दवाखान्याचा फायदा जन सामान्य माणसासह रुग्णाला लवकर होणार की नाही असा प्रश्न भेडसावत आहे
तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन राजकीय पुढार्यांची तारीख मिळत नसल्याने व बरबडा आरोग्य केंद्रात प्रशासनाने लाइटिंगची व्यवस्था केली नसल्यामुळे सदरच्या दोन्ही भव्य इमारती रुग्णाच्या सेवे पासून वंचित असल्याचे सांगण्यात येत आहेबरबडा व कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे कामे गुत्तेदाराच्या मार्फत करण्यात आले असले तरी सदरचे कामे मागे पुढे झाले परंतु आरोग्य विभागाच्या निष्काळजी पणामुळे बरबड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाइटिंगची व्यवस्था केले नसल्याचे चित्र दिसून येत आहे
सदरचे आरोग्य केंद्र जुन्या इमारती मध्येच रुग्णाला उपचार डॉक्टरला विलाज करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून ही या ठिकाणी राजकीय पुढार्याची उद्घाटन करण्यासाठी तारीख मिळत नसल्याने या भागातील रुग्णांना कुंटूरच्या ग्रामपंचायत कार्यालयात दवाखाना टाकण्याची वेळ गेल्या अनेक महिन्यापासून आली आहे
प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर राजकीय पुढाऱ्यामुळे तर बरबड्याचे आरोग्य केंद्राचे उद्घाटन लाइटिंग केले नसल्यामुळे सदरचे नूतन दवाखाने रेंगाळले असल्याची चर्चा आहे

0 Comments