मुखेड तालुक्यातील पांडुर्णी येथील रहिवासी व पाळा केंद्रांतर्गत रेखू तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मारोती पांडुरंग सूर्यवंशी वय ३५ वर्ष विध्यार्थीना शिक्षणाच्या माध्यमातून घडविणाऱ्या शिक्षकानी पांडुर्णी येथील ३० वर्षीय विवाहित महिलेस माझी पत्नी नांदेड येथे राहते असते असे त्या शिक्षकानी सांगितल्याचे कळते आहेत
तु मला फारच आवडतुस म्हणून त्या महिलेस मोबाईलवर शरीर सुखाची मागणी कारणाऱ्या आरोपी शिक्षकाला ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास घोबाडे यांनी जेरबंद केले असल्याची माहिती फौजदार गजानन काळे यांनी दिली आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेखू तांडा येथील शाळे वरील शिक्षकनी असे क्रत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खाळबळ उडाली असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळते आहे
एका शिक्षकानी ( गुरुजीनी ) असे काम करीत असल्याने त्यांच्या कडून कोणता बोध जनतेनी व विध्यार्थीनी घ्यायाचा असा प्रश्न भेडसावत असला तरी शिक्षण विभागाने यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सदरच्या शिक्षकानी त्या विवाहित महिलेस असे ही सांगितले की तु तूझ्या पतीला सांगू नकोसतुला माझे पटत नसल्यास माफ करण्यास सांगितल्याचे कळते विवाहित महिलेने ही सदरची घटनास्वतःच्या पतीला सांगितले आहे
त्यामुळे पतीसह त्या महिलेनी दिनांक ८ फेब्रुवारी रोजी मुखेड पोलिसात फिर्याद दिल्या वरून कलम ३५४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास घोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत जाधव हे करीत आहेत

0 Comments