नायगाव तालुक्यातील कृष्णुर एमआयडीसी अंतर्गत असलेल्या समाधान हॉटेल येथे दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ४ वाजता जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या बैठकीचे आयोजन केले होते
परंतु मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारासह आमदाराची बैठक बोलावल्यामुळे सदरच्या बैठकीचा खेळ खंडोबा झाला असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नांदेड जिल्ह्यात बाळासाहेबाची शिवसेना सक्षम करण्यासाठी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तालुक्यातील बरबडा येथील जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते
सदरची बैठक रद्द झाली कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारासह आमदारांना मुंबईच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सूचना केल्यानुसार सदरचे राजकीय मंडळी मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात येते
"" जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे म्हणतात ""
तालुक्यातील कृष्णुर औद्योगिक वसाहतीत असलेल्या समाधान हॉटेल मध्ये हिंगोलीचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली बैठक ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार व आमदार यांना मुंबई येथे बोलावल्यामुळे सदरची बैठक रद्द करण्यात आली
मुंबई येथील वर्षा बंगल्यावर खासदार व आमदार यांची राज्य कार्यकरणीची बैठक संध्यकाळी ७ वाजता लावली असल्याचे बडूरे यांनी सांगितले आहे

0 Comments