नायगाव तालुक्यातील घुंगराळ्याच्या उताराला आपे ऑटो नायगावाकडून घुंगराळा येत असताना पलटी झाल्यामुळे त्या ऑटो व मधील प्रवासी एका तरुणासह दोन महिला व एक मुलगा जखमी झाल्या असल्याची घटना नांदेड ते नरसी राज्य महामार्गावर दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी आडीच ते ३ वाजताच्या दरम्यान सदरचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या घुंगराळा येथील उताराला सदरचा अपे पलटी झाला यातील प्रवासी अनुसया चंद्रकांत भालेराव राहणार कृष्णुर हे आटोने प्रवास करीत होते कांताबाई चंद्रकांत बैलके राहणार इज्जतगाव विश्वंभर चंद्रकांत बैलके राहणार तालुका नायगाव यांनी मोटार सायकलवर येत होते फुलाजी नामदेव कल्याण राहणर गोजेगाव तालुका मुखेड यांनी आटोतुन प्रवास करीत होते
कुंटूर फाट्या जवळ असलेल्या व घुंगराळा येथील उताराला ऑटो व मोटार सायकलच्या अपघातात जखमी झालेल्या पेशेंटला नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून काही जनाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणा वरून ऑटो मात्र घेऊन गेल्याचे सांगण्यात येते

0 Comments