पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या बातमीचा राग मनात धरून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी आपल्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने पत्रकार वारीशे यांच्या दुचाकीला जोराची मुदाम धडक देऊन त्यांना आपल्या कारखाली चिरडले आहे
पत्रकार वारीशे यांचा मृत्यु झालेल्या कुंटुंबियास प्रशासनाच्या माध्यमातून पन्नास लाखांची मदत देण्यात यावी त्यांच्या कुंटुबियातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समावेश करावा करण्यात यावे मागणीसाठी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे
सदरच्या आरोपीच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयान कोर्टात चालून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणीचे निवेदन मराठी पत्रकर संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले आहे
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील राजापूर येथील जेष्ट पत्रकार शशिकांत वारीशे यांना कारखाली आरोपीने चिरडून हत्या केली त्या आरोपीला कडक शासन झाले पाहिजे म्हणून नायागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने काळी फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार,जिल्हा संघटक पंडित वाघमारे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे, कोषाध्यक्ष प्रकाश हणमंते, सहसचिव रामप्रसाद चन्नावार, उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,लक्ष्मण बरर्गे,तानाजी शेळगांवकर सह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती.

0 Comments