Header Ads Widget

नायगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांच्यासह शेळगावकर, गजभारे यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सत्कार !!

          माधव पवार
नायगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी ठाण्याचा नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे व तसेच गाव माझा न्यूज मिडियाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांची गाव माझा कोर कमिटीच्या चेन्नई येथील ट्रेनिंगसाठी निवड झाली असल्याने यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहेनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्याच बरोबर दिपक गजभारे यांची वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने नायगाव मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या पत्रकारानी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष नूतन पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या कार्यालयात सदरचा सन्मान करण्यात आला आहे

यावेळी तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, सहसचिव रामप्रसाद चन्नावार, गाव माझाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर, वाचकमंच तालुका प्रतिनिधी परमेश्वर जाधव, युगांतरचे तालुका प्रतिनिधी धम्मदीप भद्रे, हणमंत चंदनकर, प्रशांत वाघमारे, किरण वाघमारे, दीपक गजभारे, शिवाजी कुटुंरकर, शिवाजी पाटील बेंद्रीकर,माधव गिरगावे,पवण देगावे,कॉनिस्टेबल इंगोले, आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments