नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या मौजे घुंगराळा येथील बळेगाव ते रुई बु रस्त्यावर असलेल्या श्री गंगा ज्वेलर्स दुकानाचे आज्ञात चोरट्यानी दुकानाचे शटर तोडून दुकानातील अंदाजे अडीच ते तीन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आल्याची माहिती दुकान मालक गंगाधर शिवाजीराव पांचाळ यांनी दिली आहेतालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घुंगराळा येथे ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार संतोष कुमरे यांच्यासह पो का अशोक घुमे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे
घुंगराळा येथे यावेळी श्वान पथकाला ही पाचारण करण्यात आले होते सदरच्या श्री गंगा ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे झूमके, सोन्याचे फुल, मनी मंगलसूत्र, चांदीचे चैन, दणकडे जोडवे काकन बिंदल्या, चांदीच्या अंगट्या, मोड दागिने आदी दुकानातील चोरट्यानी लंपास केले आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांना सदरची घटना कळताच घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी केली सदरील घटनेत आज्ञात चोरट्यानी दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजीच्या अंदाजे दोनच्या सुमारास सदरची घटना असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे
घुंगराळा येथील श्री गंगा ज्वेलर्सचे मालक गंगाधरराव शिवाजीराव पांचाळ यांनी आज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे सांगितले असले तरी दुकानातील आज्ञात चोरट्यानी मात्र अडीच ते तीन लाखाचे ऐवज लंपास करण्यात आले आहे

0 Comments