Header Ads Widget

सिंधी येथे एका राष्ट्रीय महिला पैलवानाचा सत्कार सोहळा संपन्न

        माधव पवार
 जिल्ह्यातील उमरी तालुक्याच्या सिंधी येथे नायगाव विधानसभा मतदार संघाचे तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र याच मतदार संघाचे युवा नेतृत्व तथा भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रसिद्ध उद्योजक कवळे गुरुजी यांच्या हस्ते सिंधी येथील प्रणाली विठ्ठलराव पुयड या एका महिला पैलवानाचा विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला आहे

उमरी तालुक्यातील मौजे सिंधी येथे नुकताच सदरच्या सत्कार सोहळ्यात महिला पैलवानाला विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रणाली पुयड निवड झाल्याने यांची ६२ किलो वजन अंतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या असल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला आहे

सत्कार प्रसंगी यावेळी सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड,गोविंदराव पाटील सिंधीकर बापूसाहेब पाटील कौडगावकर,नामदेव पाटील कदम गंगाराम पाटील वडजे मनोज पाटील सावंत,साहेबराव पाटील शिंदे दादाराव पाटील पुयड मारोतराव बेलकर सुरेश पाटील जाधव माधव पाटील शिंदे पत्रकार बी.व्ही चव्हाण प्रल्हाद पाटील पुयड शिवाजी पाटील पुयड,दिगंबर पाटील वारे डॉ कस्तुरे आदी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments