नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील रहिवासी असलेले गावचे माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांचे पिता स्वा. गावचे पोलीस पाटील तथा गुत्तेदार डी एम पाटील डोईफोडे यांच्यावर ठीक ६ वाजून १५ मिनिटानी इज्जतगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे
यावेळी विविध पक्षातील राजकीय नेते मंडळी कडून अखेरचा निरोप देत स्वा.पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली आहे
तालुक्यातील स्वा. डी एम पाटील हे गावचे अनेक वर्ष पोलीस पाटील म्हणून चांगल्या प्रकारे काम केले आणि त्याच बरोबर गुत्तेदारीच्या माध्यमातून जिल्ह्यात व मुबंईच्या मंत्रालया पर्यंत आपली ओळख निर्माण केले त्यांचे सुपुत्र गावचे माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांनी स्वा. डी एम पाटील डोईफोडे यांना हैद्राबाद येथे नामांकित असलेले यशोदा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते परंतु उपचारा दरम्यान उपचारास पाटील प्रतिसाद दिला नसल्यामुळे दिनांक १२ जानेवारी २०२३ त्यांचे निधन झाले आहे
अंत्यविधीसाठी राजेश देशमुख कुंटूरकर, हणमंतराव पाटील चव्हाण, दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर,मनोज पाटील टाकळीकर, राहुल पाटील नकाते बेटक बिलोलीकर रावण पाटील, शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी बरबडेकर ,शिवाजीराव महोनराव धर्माधिकारी बरबडेकर, वसंत पाटील सुगावे विश्वानाथ बडूरे बरबडेकर, दत्तू पाटील होटाळकर, माधवराव पाटील टाकळीकर, माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे रुई बु माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव शिंदे आदी यावेळी उपस्थित होतेभास्करराव गुंडेगावकर, पिंटू देगावकर जनसिंग महाराज, संजय पाटील शेळगावकर विजय कशेटवार विश्वर सिंग विनोद पाटील चिंचाळकर नगर अध्यक्ष भोकर पालशेट रंदावा, सना इमानदार भोकर,यावेळी उपस्थित होते
मौजे इज्जतगाव येथे दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी अंत्य दर्शन घेण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे इज्जतगाव येथे ठेवण्यात आले स्वा. गावचे पोलीस पाटील तथा गुत्तेदार डी एम पाटील डोईफोडे यांची अंत्य यात्रातुन निघाली गावा लागतच असलेल्या शेतात त्यांच्यावर अखेरची अग्नी देण्यात आली यावेळी पाच मिनिटांची शांतता पाळून डी एम पाटील पाटील यांना श्रद्धांजली वहाण्यात आली आहे

0 Comments