Header Ads Widget

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा बीड विरोध नांदेड स्पर्धेत नायगावचे महसूल सहाय्यक शेख इनूस तर बिलोलीचे आवल कारकुन राजेश अलमवाड सर्वसाधारण विजेते !!

       माधव पवार
औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सन २०२३ साठी औरंगाबाद लातूर उस्मानाबाद बीड हिंगोली परभणी जालना नांदेड असे एकूण आठ जिल्हे स्पर्धेत उतरले होते परंतु या स्पर्धेत बीड विरोध नांदेड असा संघ क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन दुहेरी मध्ये प्रथम क्रमांक पथकावले आहेनांदेड जिल्हाचे व पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी तसेच बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांनी विजयाचा जल्लोष करीत स्पर्धेतील प्रथम विजेते शेख इनूस नायगाव व बिलोलीचे राजेश आलमवाड यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहेऔरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ही औरंगाबाद येथे घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेसाठी बीड विरोध नांदेड स्पर्धेचा सामना लागला होता या घेण्यात आलेल्या स्पर्धेत नायगावचे महसूल सहाय्यक शेख इनूस तर बिलोलीचे आवल कारकुन राजेश अलमवाड यांनी स्पर्धेत विशेष सहभाग घेतला होतास्पर्धेसाठी ८ जिल्ह्यातील प्रशासनातील खेळाडू खेळण्यासाठी आले होते परंतु बीड जिल्हा विरोध नांदेड जिल्हा अशी स्पर्धा लागल्यामुळे नांदेड जिल्हाच्या नायगाव व बिलोली महसूल प्रशासनातील महसूल सहाय्यक शेख इनूस, राजेश आलमवाड हे स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याची कौतुकाची थाप विजेत्याच्या पाठीवर मारण्यात आली आहे

औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा बीड विरोध नांदेड स्पर्धेत नायगावचे महसूल सहाय्यक शेख इनूस तर बिलोलीचे आवल कारकुन राजेश अलमवाड सदरचा सामना जिकूंन विजेते ठरले असल्यामुळे विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments