नांदेड / प्रतिनिधी : पंकज आयनेले
महावीर सोसायटी येथील नरसिंह विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक ए.बी.सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक ए.बी.सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात वरिष्ठ लिपिक सौ.एस.एस.पहाडे, महिला शिक्षिका सौ के ए कर्णवार सौ एस एस पल्लेवाड
सौ.एस.एल.गोदरे,सौ.एल.आर.कांबळे,सौ.ए.बी.आयनेले,सौ.आर.एम.अक्केमवार,यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यात कु. अनुष्का गिरबिडे, सोनाक्षी हतवळणे, श्रुती भिसे, पायल हटकर, प्रतीक्षा झुंजारे, मधू असले, शिवानी धाकपाडे, स्वाती हनुमंते, पुनम सातोरे, दिपाली दुधारे, शुभांगी पारधे, प्रेरणा हटकर, साईराज धाकपाडे, सम्राट सोनसळे, सानिध्य लोखंडे, गौरव खंदारे आदींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए. बी. सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाबरोबरच समाजमनाची मशागत करण्याचे ध्येय उरी बाळगून अज्ञानी समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचे कार्य केल्यामुळेच आज सर्व क्षेत्रात महिलांचा सन्मान असल्याचे पाहायला मिळते तेव्हा विद्यार्थिनींनी उच्चशिक्षित होऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे अहवाल उपस्थित महिला शिक्षकांनी यावेळी केल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सहशिक्षक पी.पी.आयनेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा प्रस्ताविकेतून सांगून सर्व उपस्थित महिला शिक्षिका व मुलींना सावित्रीबाई फुलें जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल व उपस्थित आभार आयनेले यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments