Header Ads Widget

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी राम तरटे उपाध्यक्ष पदी सुभाष पेरकेवार तर संघटकपदी पंडीत वाघमारे यांची निवड !!


नायगाव फास्ट
न्यूज नेटवर्क :
---गोविंद नरसीकर - 

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी दैनिक उद्याच्या मराठवाड्याचे उपसंपादक तथा नांदेड आकाशवाणी केंद्राचे नैमित्तिक उद्घोषक राम तरटे यांची तर दैनिक प्रजावाणीचे पञकार सुभाष पेरकेवार यांची व दैनिक सामानाचे पञकार पंडीत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहेमराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्हा सरचिटणीस पदी राम तरटे, उपाध्यक्ष सुभाष पेरकेवार, संघटक  पंडीत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे

सदरची निवड परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आणि जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी नुकतीच जाहीर केली आहे 
जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी कोअर कमिटीतील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, चारुदत्त चौधरी ,विजय जोशी, प्रदीप नागापूरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत दादा सोनखेडकर आदी उपस्थित होते जेष्ट पञकार मनोहर तेलंग, प्रभाकर लखपत्रेवार, गंगाधर भिलवंडे, गजानन चौधरी, सय्यद जाफर, दिलीप वाघमारे, गोविंद टोकलवाड, लक्ष्मण बरगे, गंगाधर गंगासागरे, रामप्रसाद चनावार, प्रकाश महीफळे, आनंदराव सुर्यवंशी, मनोहर मोरे,मारोती बारदेवाड, हणमंत वाडेकर, बालाजी हणमंते, प्रकाश हणमंते, अंकुश गायकवाड सह जिल्ह्यातील पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments