Header Ads Widget

बरबडा येथे विविध ठिकाणी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती साजरी

बरबडा :-किरण हणमंते - 

बरबडा येथील ग्रामपंचायत कार्यालय च्या सभागृहात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाने यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालुन वंदन करण्यात आले त्यावेळी  ग्रामविकास अधिकारी सुर्यकांत बोंडले, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सतीश शिंगेवाड, गौतम हनमंते, पांडुरंग एडके, सदाशिव पा. पचलिंग, संजय पा. पचलिंग, बाबु इंद्रवाड, माजी उपसरपंच देविदास हनमंते, संगणक  परिचालक किरण हनमंते, बालाजी जंगीलवाड,

बाबु शेवाळे, व्यंकटी गिरे, शंकर मर्गेवाड, दत्ता शेवाळे, पप्पु पाटील शिंदे, पांडुरंग गंजेवार, बालाजी रुद्रवाड, अविनाश हनमंते, ज्ञानेश्वर सुरेवाड, भंडरवाड, देविदास भंडरवाड, अंगणवाडी कार्यकर्त्या आशाबाई सर्जे, विडेकर यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब  यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख माधव रेडेवाड व शाळेचे केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पहिली ते चौथी च्या मुलींनी व मुलांनी वर्गातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभुषा परिधान केले होते. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती यांची उपस्थिती होती.

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रा. सुदर्शन  धर्माधिकारी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी  उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सुर्यकांत फड, कॉलेज चे प्रा.वसंत शिंदे याप्रसंगी शिक्षक आणि शिक्षिका यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments