हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्यामुळे शाळेत शिक्षण घेणारे विध्यार्थी जवळ पास दोनशेच्या वर विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत असताना सुद्धा शासन विध्यार्थीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्यामुळे येथील सुज्ञान नगरीकानी फिल्टर भेट देऊन व्यवस्था केली आहे
पळसपूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय वानखेडे आपल्या कर्तव्याची व शिक्षणाची जाणीव असले वानखेडे यांनी स्वतःच्या शेतातील पिण्याचे पाणी शाळेला दिल्याने शिक्षकासह विध्यार्थीत समाधान व्यक्त होत आहेप्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोणत्या शासकीय शाळे बरोबर खाजगी शाळेत फिल्टरची व्यवस्थित व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे विध्यार्थीना घरून अथवा गावातील बोरचे पाणी आणून पिवावे लागते शासनाने सर्व शाळेत फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना सुद्धा शासन या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे
गावातील एका सुशिक्षित बेरोजगार शिक्षण प्रेमी व्यवसायीकाने शेती करत असलेले अनिल गायकवाड यांनी त्यांच्या आजीबाई स्वर्गीय गिरजाबाई गायकवाड यांच्या समनार्थ शाळेला फिल्टर भेट दिली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला पन्नास लिटरचे
पाणी फिल्टर सस्ने ही भेट म्हणून प्रजासत्ताक दिनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची तहान भागवली या गावातील गायकवाड यांनी विध्यार्थीच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील जनतेने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
यावेळी आरोप्लॅनचि रिबिन कापून उद्घाटन करताना विठ्ठल गायकवाड शंकर वानखेडे पोलीस पाटील सदानंद शिंदे सुनील पतंगे किसनराव वानखेडे बाळू देवसरकर गजानन देवसरकर उपसरपंच गजानन वानखेडे जेगदेराव बोंबिलवार सदाशिव वानखेडे यांच्यासह आदी उपस्थितीत होते
शाळेतील मुख्याध्यापक व्हि डि हुबे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्तादिना निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ध्वजारोहन करण्यात आले आहे

0 Comments