नांदेड जिल्हाचे भाजपाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, शिवराज पाटील होटाळकर, नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ यांनी दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी मोजे इज्जतगाव स्व.पोलीस पाटील तथा नामांकित गुत्तेदार डी एम पाटील इज्जतगावकर यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते
घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर वरून आले होते त्या रस्त्याची बे अवस्था खासदारानी पाहिली का ? असा सवाल जनतेसह जनसामान्य माणसातून केला जात असला तरी विद्यमान खासदाररानी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना धारेवर धरतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे
-------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून अशा अवस्थेत असल्यामुळे या विभागातील नागरिकांना किती वेदना होत असावेत विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाणून घेणे गरजेचे असले तरी " पुढारी असे अधिकारी तसे " असल्यामुळे एकमेकाचा ताळमेळ लागत नसल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा असल्यामुळे या रस्त्याकडे सदरची अधिकारी हुंगून हीं पाहत नाहीत आणि राजकीय पुढारी लक्ष देत नसल्यामुळे जिल्ह्यातील पुढारी असे आणि अधिकारी तसे म्हण्याची वेळ आता जनेतेवर आली असल्यामुळे जनसामान्य माणसातून खंत व्यक्त करण्यात येत आहे

0 Comments