Header Ads Widget

हैद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटल सिंकीद्राबाद येथे माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या वडिलांचे निधन !!

     माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव रहिवासी असलेले जनसामान्याचे गुत्तेदार म्हणून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेले गुत्तेदार व गावचे पोलीस पाटील स्वा. दिंगाबरराव माधवराव पाटील डोईफोडे इज्जतगावकर यांचे दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान हैद्राबाद येथील यशोदा हॉस्पिटल सिंकीद्राबाद येथे निधन झाले आहे
     
                 "" भावपूर्ण श्रद्धांजली ""
ते मृत्यू समयी ८१ वर्षाचे होते ते इज्जतगाव येथील माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांचे वडील स्व.दिंगाबरराव माधवराव डोईफोडे यांना श्रद्धांजली !!
तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील माजी सरपंच संजीव पाटील इज्जतगावकर यांनी स्वा. दिंगाबरराव माधवराव पाटील डोईफोडे इज्जतगावकर यांच्या निधनाची माहिती नायगाव फास्ट न्यूजला दिली असून डोईफोडे यांच्यावर दिनांक १२ जानेवारी २०२३ सायंकाळी ठिक ५ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे

मौजे इज्जतगाव येथील पोलीस पाटील तथा गुत्तेदार स्वा. दिंगाबरराव माधवराव डोईफोडे इज्जतगावकर सर्वात जास्त गुत्तेदार या नावाने प्रसिद्ध होते गेले पन्नास वर्ष गुत्तेदारीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना रोजगार मिळवून दिले आहेत  दिवंगत दिंगाबरराव पाटील डोईफोडे इज्जतगावकर यांच्या निधनाची बातमी कळाताच राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून भाव पूर्ण श्रद्धांजली वहाण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments