Header Ads Widget

बळेगाव बंधाऱ्याचे पाणी रुईच्या पाझर तलावात सोडण्याची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे निलेश देशमुख यांची मागणी

          माधव पवार
नायगाव तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे पाणी सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा जवळ येत असल्यामुळे व पाझर तलावातील पाण्याची पातळी खाली गेली आहे

रुईच्या पाझर तलावात सदरचे पाणी सोडण्याची नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे रुई बु येथील गावच्या महिला सरपंच सौ प्रियंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नुकतीच मागणी  केली आहे
तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे व रुई बु येथून शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी अधून मधून पाणी कोलंबीच्या शेतकऱ्यांना सोडल्या जाते परंतु सदरचे पाणी रुईच्या शेतकऱ्याच्या शेतातून अंडरग्राउंड जाते शासनाने रुई येथील पाझर तलावाच्या मुख्य ठिकाणी पाणी सोडण्यासाठी वॉलची व्यवस्था केली आहे 
-----------------------------------------------------------------------
रुई बु येथील पाझर तलावात सदरचे पाणी सोडण्यात यावे असे गावचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी खासदाराकडे एका निवेदनाद्वारे केली मागणी केली आहे
बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्याचा घुंगराळा बळेगाव रुई बु. सावरखेड वंजारवाडी या गावातील शेतकऱ्यांसाठी सदरच्या बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्यामुळे सदरच्या बंधार्‍याचे पाणी सदरच्या शेतकऱ्यांना मिळण्यात यावे असे ही असी ही मागणी करण्यात आली आहे

जर बळेगाव बंधाऱ्याचे पाणी या विभागातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक चंणचण दूर होईल या हेतूने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे निलेश देशमुख यांनी मागणी केली आहे 

Post a Comment

0 Comments