Header Ads Widget

हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची तीन मटका बुक्कीवर छापा मालकासह पाच जनावर गुन्हा दाखल ६ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त -



हिमायतनगर  प्रतिनिधी /- नागोराव शिंदे -

शहरातील चौपाटी परिसरात दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी.भुसनूर यांनी स्वतः दुपारी दीडच्या सुमारास पोस्ट ऑफिसच्या बाजूस टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत असल्याची त्यांना गोपनीय माहिती मिळताच हिमायतनगर येथील पोहेका अशोक सिंगनवाड, पो.ना. चौदनते ,व आवुलवार यांना सोबत घेऊन तेथील मटका बुकिंवर छापा टाकून तीन आरोपीस अटक केली असल्याची माहिती मिळते आहें
याबाबत सविस्तर माहिती अशी की  हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात मटका व जुगाराचे खुलेआम अड्डे सुरू आहेत असल्यामुळे सदरच्या पोलीसांना गोपनीय माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे ,अपर पोलीस अधीक्षक धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांचे एक पथक नेमविले आहेंशहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलून पोलिसांनी शहरात कार्यवाही सुरू केली आहे

शहरात अवैध धंदे करणाऱ्यात पोलीसाची धास्ती आता निर्माण झाली असून शहरातील पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या तीन दुकानात काही जुगारी हे टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती पोलिस निरीक्षक बि. डी. भुसनूर यांनी स्वतः हा पो.हे.का. सिंगणवाड, चौदंते,सह आवुलवार यांना घेऊन चौपाटी परिसरातील टाईम बाजार नावाच्या अवैध धंद्यावर छापा मारला आहें



Post a Comment

0 Comments