बरबडा :- दिनांक २५ जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिन व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त या स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वयंशासन दिना निमित्त आजचे मुख्याध्यापक म्हणून शरद गौतम हनमंते तर उपमुख्याध्यापक शुभम राजेंद्र कांबळे आणि पर्यवेक्षक कु. शिवानी परमेश्वर कंदलवाड तसेच ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक म्हणून कु.वसुंधरा व्यंकटी गिरे यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक वसंत शिंदे ,प्रा.सुदर्शन धर्माधिकारी हे होते. यामध्ये ६५ मुलामुलींनी सहभाग नोंदविला होता त्या ४० मुली आणि २५ मुल होते. सुत्रसंचलन कु. वैष्णवी बाबाराव पुप्पलवाड, कु. गंगासागर हनमंत धुमाळे तर आभार कु. मनिषा गड्डमवाड यांनी मानले या सर्व कार्यक्रमासाठी प्रा.तगडपल्लेवार टी.जे.,प्रा. मुदखेडे पंढरीनाथ, प्रा. भेलोंडे ,चोले यु.डी.,लष्करे बी.डी. यांनी परीश्रम घेतले.

0 Comments