नायगाव तालुक्यासह बिलोली तालुक्यातील या तीन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नायगाव, कुंटूर, रामतीर्थ, पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण पोलीस पाटलाच्या ७५ रिक्त जागा असल्यामुळे कधी भरण्यात येतील असा प्रश्न जनतेला पडला आहे
या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४४ पोलीस पाटील कार्यरत असल्याची माहिती मिळाली असल्यामुळे एकूण ७५ रिक्त जागा शासन कधी भरणार यांची ग्रामीण भागात जोरदार चर्चा चालू आहे
दोन्ही तालुक्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि गावा अंतर्गतचे पोलीस पाटील यांचे समन्वय असल्यामुळे गावात तंटा काही अनुचित प्रकार घडल्याच्या नंतर संबंधित पोलीस पाटील यांना संपर्क करून माहिती घेतली जाते परंतु नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ३५ ते ३६ गावे आहेत
परंतु रातोळी केदारवडगाव मारवाळी होटाळा मुस्तापूर कोलंबी पळसगाव कार्ला पिंपळगाव खैरगाव अंचोली लालंवडी येथील पोलीस पाटलाच्या जागा रिक्त आहेत तर एकूण २३ पोलीस पाटील कार्यरत असल्याची माहिती पोनि अभिजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४४ गावे आहेत त्यापैकी १७ पोलीस पाटील कार्यरत आहेत तर २३ पोलीस पाटलाच्या जागा रिक्त असल्याची माहिती ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि संकेत दिघे यांनी दिली असून तेवीस गावातील कारभार पोलीस पाटलाविना चालत असल्याचे वास्तव चित्र पाहावायास मिळत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४४ ते ४५ गावे आहेत या गावा पैकी सुजलेगाव बरबडा काहाळा बु, काहाळा खुर्द हिप्परगा चारवाडी सांगवी पाटोदा (त.ब) ताकबीड मेळगाव हुस्सा टाकळी आंतरगाव दुगाव या १४ गावांत पोलीस पाटील कार्यरत आहेत तर ३१ गावांत पोलीस पाटलाचे रिक्त पदे असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय तांबोळी यांनी दिली आहे

0 Comments