माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय विकासाचे दिशेने गेली असल्यामुळे विविध योजनेच्या माध्यमातून गावांत रस्त्याच्या कामा बरोबर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात पीवर ब्लॉक करून करून पाण्याची व्यवस्थित व्यवस्था करून दिली असल्यामुळे सदरील शाळा एकदम टकाटक झाली असल्याचे वास्तव चित्र बळेगाव येथे पाहवयांस मिळत आहे
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ वर्षाताई मिलिंद गायकवाड, उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर ग्रामसेवक आर एल मदेवाड यांनी गावच्या विकास कामासाठी विविध योजनेच्या अंतर्गत कामे करत असल्यामुळे गावाचा विकास ही मोठया प्रमाणात होताना दिसून येत असून रस्त्याचे कामे पाण्याच्या व्यवस्था व्यायाम शाळा, झिम असे अनेक प्रकारच्या विकासाला चालना मिळाली आहे
-------------------------------------------------------------------
बळेगाव ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा ही सुंदर दिसली पाहिजे या डोळस विचारातून सरपंच आणि उपसरपंच यांनी पुढाकार घेऊन सदरच्या शाळेकडे लक्ष केंद्रित करून शाळेत पीवर ब्लॉक करून दिले आहेत ही शाळा इयत्ता पाचवी पर्यंत असल्यामुळे या शाळेत एकूण विध्यार्थी संख्या ११९ तर शिक्षक केवळ तीन आहेत
-------------------------------------------------------------------
मुख्याध्यापक टी एस पगलवाड, सहशिक्षक पी के येडे, सहशिक्षक डी आर पवार हे कार्यरत आहेत तर एक जागा रिक्त असल्याने जिल्हा परिषदच्या मुख्यकार्यकाऱ्यानी सदरची जागा भरून शिक्षक उपलब्ध करून दयावेत असी मागणी पालकांनी केली आहे
-------------------------------------------------------------------
सरपंच सौ वर्षा ताई मिलिंद गायकवाड, उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर ग्रामसेवक आर एल मदेवाड, ग्रामपंचायत सदस्य भगवान कोंडीबा बेलकर, सौ सत्वशिला आनंदराव बेलकर, श्रीमती सुल्याबाई माधवराव बेलकर, सौ अनुसयाबाई गोविंद बदवाड, लक्ष्मण बापूराव इबितवार, सौ जनाबाई आनंदा बेलकर, गजानन दिंगाबर झुंजरे यांनी सदरची ग्रामपंचायत कार्यालय विकासाचे वळविल्यामुळे गावाचा विकास जोमदार होताना दिसून येत आहे

0 Comments