Header Ads Widget

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये कुंटूर पोलिस स्टेशन व रोशनी कंप्युटर बरबडा तर्फे सायबर सिक्युरिटी जनजागृती इव्हेन्ट संपन्न


बरबडा :-किरण हणमंते 

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम के सी एल व पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांच्या मार्फत पोलिस स्टेशन कुंटूर व रोशनी कंप्युटर एज्युकेशन बरबडा यांच्या वतीने आयोजित सायबर सिक्युरिटी इव्हेंट जनजागृती अभियान याचे आयोजन करण्यात आले आले होते.
----------------------------------------------------------------   
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश बडूरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कुंटूर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक अटकोरे, पोलिस जमादार लक्ष्मण सोनकांबळे, कंधारे , प्रा. वसंत शिंदे, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, एम.के.सी.एल.नांदेडचे अखिल सय्यद होते.
-------------------------------------------------------------------
सर्व मान्यवरांचा सत्कार शाल व हार घालुन रोशनी कंप्युटर चे संचालक किरण सर हनमंते यांनी केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशनी कंप्युटर चे संचालक किरण सर हनमंते यांनी केले. त्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला या बद्दल सविस्तर माहिती दिली

या मागे एम के सी एल चा काय अजेंडा आहे आणि हि काळाची गरज ओळखून विद्यार्थी व नागरिका पर्यंत जनजागृती करण्याचा मानस असल्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या डिजिटल युगात वेळोवेळी मार्गदर्शन करणं हे पण तितकंच महत्वाचे असुन जशी आपण आपली सुरक्षा करत असतो तशीच मोबाईल हाताळत असताना त्याची घेण्यात येणारी सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन एन एम तिप्पलवाड केले.
पोलिस स्टेशन चे कंधारे साहेब यांनी होणाऱ्या गुन्ह्या बद्दल माहिती दिली आणि सायबर पासुन सुरक्षित राहण्यासाठी काय करावे लागेल व नक्कीच कळत नकळत होणाऱ्या चुका मोबाईल च्या माध्यमातून टाळण्यासाठी सुरक्षा महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले.सोशल मीडिया च्या माध्यमातुन कोणाच्याही भावना न दुखावणे, ते दुखावल्यास काही आक्षेपार्ह चॅटिंग मॅसेज केल्यास, व्हिडीओ, विचित्र व्यंग फोटो पोस्ट केल्यास कलमान्वये गुन्ह्यास पात्र होतो

म्हणुन विद्यार्थ्याने चांगल्या रितीने मोबाईल हाताळला पाहिजे असे सांगितले तसेच त्यामधून खेळले जाणारे पबजी सारखे गेम खेळू नये म्हणुन सिक्युरिटी असणे गरजेचे आहे याबाबत ची जनजागृती करणे विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर पालकांचे आणि नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगण्यात आले.


Post a Comment

0 Comments