हदगाव प्रतिनिधी : गजानन जिदेवार :-
शहरी भागात असो की ग्रामीण भागात असो स्पर्धा ही अनेक क्षेत्रात लागली असल्यामुळे शिक्षण क्षेत्र असो की व्यापारी गट असो अशा अनेक क्षेत्रात मोठमोठ्या स्पर्धा लागल्या असल्यामुळे विविध स्पर्धेच्या माध्यमातून मुली असो की मुलं स्पर्धेत विशेष भाग घेऊन यशवंत बनत असल्यामुळे शरीराला व त्यांच्या बुद्धीला चालना देत मुले व मुली विशेष सहभाग घेत आहेत------------------------------------------------------------------
हदगावच्या आष्टी येथील एका दहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या गणेश राजू कोतेपल्लू यांनी पाच फुटाच्या उंची वरून उडी मारून द्वितीय क्रमांक मिळविल्यामुळे त्यांचे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन - !!
-------------------------------------------------------------------
तालुकास्तरीय मैदानी शालेय क्रीडास्पर्धा नुकतीच श्री दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय हदगाव येथे पार पडली. या स्पर्धेत जि प हायस्कूल आष्टी, येथील इयत्ता दही वी तील विद्यार्थी,गणेश राजू कोतेपल्लू याने ५ फुटांची उंच उडी मारून सतरा वर्षाखालील गटातून हदगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका गंगासागर मॅडम सह, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळेतील इतर शिक्षक वृंद, व सर्व शालेय समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले आहे

0 Comments