Header Ads Widget

आयुष कदम या बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाला दीड लाख रुपयांचा निधी- आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नाला यश !!


नांदेड -प्रतिनिधी : प्रल्हाद आयनेले :- 

निळा येथिल आयुष अंकुश कदम या बाळाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दीड लाख रुपयांचा निधी मिळाला असून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे

नांदेड तालुक्यातील मौजे.निळा ता.जि.नांदेड येथील रहिवासी अंकुश कदम यांचे  आयुष अंकुश कदम हे लहान बाळ हैदराबाद येथील किम्स रुग्णालय या रुग्णालयामध्ये किडनी च्या आजाराचे उपचार घेत होते. त्यांच्या उपचाराचा खर्च आवकाच्या बाहेर होत असताना त्याच्या  गावातील गावकऱ्यांनी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देण्याची मागणी केली
-------------------------------------------------------------------
आमदार कल्याणकर यांनी त्वरित मुख्यमंत्री सहायता निधी करिता लागणारे सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे सांगितले. अंकुश कदम यांच्या नातेवाईकांनी सर्व कागदपत्रे जमवून आमदार कल्याणकर यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केली आहे
-------------------------------------------------------------------
आमदार कल्याणकर यांनी स्वतः संबंधित सहायता निधीची फाईल नांदेडहून मुंबईला घेऊन जाऊन महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे विशेष बाब म्हणून मदत मिळवून देण्याची विनंती केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर यांची विनंती मान्य करून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे सदरील फाईल विशेष बाब म्हणून तात्काळ मंजुरी करून देण्याचे सांगितले.
-------------------------------------------------------------------
या आधीचे सरकार हे दुसऱ्या राज्यातील हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी करिता मंजुरी देत नव्हते. त्यामुळे मदत मिळते की नाही याची धाकधूक रुग्णाच्या नातेवाईकांना होती.पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार कल्याणकर यांना  शब्द दिल्यानुसार प्रथमच हैदराबाद येथील किम्स रुग्णालय मध्ये सुद्धा रुग्ण आयुष अंकुश कदम ह्याला अक्षरी दीड लक्ष रुपये (१५००००) मुख्यमंत्री सहायता निधी मधून मंजूर करून दिले व त्याला उपचाराकरिता नवसंजीवनी दिली.
-------------------------------------------------------------------
आयुष च्या आई-वडिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार  बालाजी कल्याणकर यांचे  आभार मानले आहे 
-------------------------------------------------------------------
मुख्यमंत्री सहायता निधी मधून बाहेरील राज्यातील रुग्णालयामध्ये मदत मिळवून देण्याचे हे मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचे कदम यांनी सांगितले असुन आयुषला मदत करण्यामध्ये सर्व स्तरातील लोकांची मदत मिळाली त्यामध्ये निळा गावातील गावकऱ्यांचा व नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे कदम यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी आता जास्त थांबावे लागत नसल्यामुळे व सहायता निधी मध्ये जास्तीचे आजार व रकमेची वाढ करण्यात आल्यामुळे होत असलेल्या गतिमान कामामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments