Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून हर घर घरगुती मीटर अल्प दरात उपलब्ध करून द्यावी जनतेची मागणी -

       माधव पवार
नायगाव तालुक्यासह खेड्यापाड्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हर घर घरगुती मीटर ही मोहीम राबवून अल्प दरात उपलब्ध करून दिल्यास मीटरची संख्या वाढेल आणि विद्युत वितरण कंपनीला ग्राहका कडून मोठा फायदा होईल आणि नागरिकांना चांगलाच दिलासा मिळेल अशी अपेक्षा जनतेनी विद्युत वितरण कंपनीकडे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून मागणी केली आहे
-------------------------------------------------------------------
विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून काही वर्षाखाली शंभर रुपये पन्नास रुपये १५ रुपयात विविध योजनांच्या अंतर्गत ग्राहकांना घरगुती मीटरचे कोटेशन दिले होते परंतु मीटरची रेंडिंग घेणाऱ्या लोकांनी बिले वाढवून देत असल्यामुळे ग्रहक मीटर घेण्यासाठी धजावत नाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत रिडींग घेतली तर घर गुती मीटरचे व्यस्थित येतील व मीटरची संख्या वाढेल यात काही शंका नसल्याचे ही जनतेतून बोलल्या जात आहे 
त्याच पद्धतीने घरगुती मीटर धारकांना विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी हर घर घरगुती मीटर ही योजना राबवून नागरिकांना अल्प दरात मीटरची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करण्यात येत असून जर सदरच्या कंपनी धारकानी सदरची योजना प्रभावीपणे राबविल्यास एका बाजूने आकोडे मुक्त होतील आणि विद्युत वितरण कंपनी कडून ग्राहकांना मदत होईल असी अपेक्षा ही नागरिकांनी केली आहे 
सदरच्या मागणीची वरिष्ठ अधिकाऱ्यानी दखल घेऊन घर घर मीटर हर घर मीटर उपलब्ध करून देण्यासाठी सदरची मोहीम प्रभावीपणे राबविली पाहिजे असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

विद्युत वितरण कंपनीच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यानी सदरची मोहीम राबविली तर एका बाजूने अकोड्याचा बीमोड होऊन वीज चोरीला आळा बसेल दुसऱ्या बाजूने विद्युत वितरण कंपनीला घरगुती मीटर धारका कडून मीटर वसुलीचा फायदा होईल सदरची मोहीमेची प्रभावी पणे अंमलबजावणी झाली पाहिजे असे ही जनतेनी अपेक्षा व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments